dry fish 
मुंबई

खवय्यांच्या ताटातून सुकी मासळी गायब, व्यवसायिकांवर देखील संक्रात

सकाळवृत्तसेवा

वसई : अवकाळी पाऊस, चक्रीवादळ यासह वातावरणात झालेल्या बदलांमुळे मासेमारी करणे अवघड झाले आहे. मच्छीमारांवरील संकटाचे हे दुष्टचक्र कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच असून आता कोरोना विषाणुमळे या व्यवसायावर संक्रात आली आहे. लॉकडाऊनचा परिणाम सुक्या मासळीवर देखील परिणाम झाला असून ऐन हंगामात वसई तालुक्यातील बाजार ओस पडल्याने मच्छिमारांना पुन्हा आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

ऑक्टोबरपासून वसईच्या विविध भागातील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात मासळी सुकवण्यास सुरवात होते. बोंबील, करंदी, मांदेली, वागटी, जवळा ही सुकविलेली मासळी ही फेब्रुवारी ते मे दरम्यान विविध ठिकाणच्या बाजारात विक्रीसाठी जाते. या हंगामात मासळीला नागरिकांकडून मोठी मागणीदेखील असते, परंतु विक्रीच्या काळातच कोरोनाचे संकट येऊन ठेपल्याने व्यापार ठप्प झाला आहे. गेल्यावर्षी देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. अवकाळी पाऊस आल्याने अर्नाळा समुद्रकिनारी सुकण्यासाठी ठेवलेली मासळी खराब होऊन 25 ते 30 लाखांचे नुकसान सोसावे लागले होते. येथील सुक्या मासळीच्या खरेदीसाठी वसई, पाचूबंदर , किल्लाबंदर , अर्नाळा येथे वाडा, जव्हार, मोखाडा व अन्य भागातून व्यापारी येतात. एका गोणीत 40 किलो सुकी मासळी असते.

पावसाळ्यात मासे कमी मिळत असल्याने सुक्या मासळीचा व्यवसाय करून कोळी बांधव यातून कमाई करतात. याशिवाय शेतीची कामे आणि येणाऱ्या मजुरांसाठी आगोदरच बेगमी केली जाते, परंतु वाहतूक बंद असल्याने कोणीही खरेदीसाठी वसईत फिरकलेले नाही. वसईतील स्थानिक देखील घरी बोंबलाचे कालवण, झुणका, आंबट, आचार यासह अन्य विविध प्रकारचे पदार्थ तयार करतात. यंदा मात्र कोरोना संकटामुळे बाजारच बंद असल्याने सुकी मासळी मिळत नाही. यामुळे खवय्ये निराश झाले असून मच्छीमार बांधवाना देखील आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

गेल्यावर्षांपासून नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. सुक्या मासळीचा हंगाम असताना कोरोना धडकल्याने विक्रीवर परिणाम झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह मासेमारीवर अवलंबून असतो मात्र, सुक्या मासळी विक्रीचे बाजारही बंद झाले असल्याने आता उपासमारीची वेळ आली आहे.
- रेखा  तांडेल, विक्रेत्या, वसई

Dry fish loss business in Vasai, read full story

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई लोकल प्रशासनाचा मोठा निर्णय! रात्री १२ ते सकाळी १० पर्यंत मेगाब्लॉक; अनेक गाड्या रद्द, पण कोणत्या मार्गावर?

Koyna Dam Water Release Update : शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा! कोयनेचा विसर्ग वाढला; पहा किती क्युसेक वेगाने येतंय पाणी?

"माझ्या घरी दोन चिक्स.."! अरे ए माईक सुरूय... ड्वेन ब्राव्होला KKR कॅप्टन अजिंक्य रहाणेने थांबवले... वादग्रस्त Video Viral

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

SCROLL FOR NEXT